अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – ऑफीसच्या भाडे करारात मुदत वाढ किंवा दोन लाख रुपयांची खंडणी मागत (Case of Atrocity) बांधकाम व्यावसायिकाला अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय महादेव गायकवाड (रा.मार्केटयार्ड, पुणे) असे अटक आरोपीचे नाव असून स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर धमकावणे व खंडणी मागणे याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी एक वर्षांपूर्वी त्यांचे ऑफिस आरोपीला भाडेतत्वावर दिले होते. यावेळी आरोपीने (Case of Atrocity) फिर्यादी यांचे भाडे थकविले व त्याच्या भाडे कराराची मुदत देखील संपली असल्याने फिर्यादी यांनी आरोपीला गाळा सोडण्यास सांगितले. यावेळी आरोपीने फिर्यादीशी भांडण केले. याच रागातून त्याने फिर्यादींकडे भाडे कराराची मुदतवाढ किंवा 2 लाख रुपये देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण केली नाही तर फिर्यादीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

Pune Police : पोलिसांची धाडशी कारवाई, सोनसाखळी चोरट्याला पाठलाग करून पकडले..

तक्रारीनंतर पोलिसांनी गायकवाड याला अटक केले. यावेळी पोलिसांनी त्याच्या ऑफीसची झडती घेतली असता त्याच्या ऑफीसमध्ये वेगवेगळ्या फर्मचे शिक्के, लेटर्स, शाळांच्या दाखल्यांच्या प्रती सापडल्या. यावेळी आरोपीने अनेकांकडून खंडणी उकळल्याचे तसेच शाळा प्रवेशासाठी लोन करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तसेच इतरांवर खोटे अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच, त्याने गुन्हे दाखल केले नाही तर पोलिसांवरही आंदोलन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी गायकवाड विरोधात तक्रार असेल तर न घाबरता स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे आवाहन नागरिकांना केले आहे.याचा पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.