Pune : महर्षीनगरमध्ये 9 वाहनांची तोडफोड; तरुणास अटक

एमपीसी न्यूज : महर्षीनगर भागातून मध्यरात्री नऊ वाहनांची (Pune) तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणास ताब्यात घेतले आहे.

ईश्वर सावणे (वय 20, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावणे मध्यरात्री महर्षीनगर भागातून निघाला होता.

त्याला एकाने हटकले. त्यानंतर सावणे पुन्हा महर्षीनगर भागात आला. त्याने परिसरातील नऊ वाहनांची तोडफोड केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.