Pune : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा

एमपीसी न्यूज : यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा (Pune) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे यावर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी योगी आदित्यनाथ पुण्यात येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे.

Pune : महर्षीनगरमध्ये 9 वाहनांची तोडफोड; तरुणास अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान (Pune) पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.