PMPML : आता पीएमपीएमएलही होणार स्मार्ट, बसमध्ये बसवणार यूपीआय स्कॅनिंग कोड

एमपीसी न्यूज – पुण्यात मेट्रो आली. पुणे स्मार्ट झाले मग (PMPML) पुण्याची खास ओळख असणारी पीएमपीएमल किती दिवस मागे राहणार ना….यातूनच पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) एक मोठे पाऊल उचलणार असून ती लवकरच कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहे.

प्रवाश्यासोबत सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या रोजच्या कटकटीवर एक रामबाण उपाय शोधून काढत प्रत्येक बसमध्ये युपीआय कोड लावण्यात येणार आहे. ज्यामुळे नागरिक तो कोड स्कॅन करून त्यांच्या तिकीटाची योग्य ती रक्कम भरू शकणार आहेत.

Pune : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा

पीएमपीएम प्रशासनाने बस मध्ये आता गुगल पे आणि फोन पे ची सुविधा यूपीआय कोड स्कॅन करत प्रवाशांना पीएमपीएलचे तिकीट काढण्याची ही अनोखी सुविधा उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यापासून पीएमपीएलच्या सर्व बसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले आहे.

सुट्ट्या पैशांचा घोळ मिटवण्यासाठी पीएमपीएल कडून हा निर्णय (PMPML) घेतला असून नागरिकांना आत्ता सारखे रोख रक्कम देऊनही तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही पीएमपीएमएलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्य स्थितीला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण 378 मार्गावर 1 हजार 783 बसेस संचलनात आहेत. सुरुवातील काही बसेस मध्ये हे कोड बसवण्यात येतील व हळुहळु नागरिकांचा प्रतिसाद पहता प्रत्येक बसमध्ये कोड बसवण्यात येतील.

पीएमपीएमएलच्या या स्मार्ट निर्णयाचे प्रवाशांकडूनही कौतुक केले जात आहे.

FINNAPP या संस्थेचे 18 वे यश !

आता पीएमपीएमएलमध्ये सुद्धा ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे ऑगस्ट 2019 मध्ये  FINNAPP या संस्थेमार्फत पीएमपीएमएलच्या आयुक्तांना हा प्रस्ताव दिला होता आणि दोन वर्षानंतर त्याची आता अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी FINNAPP Team चे अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.