Maharashtra : दहावी आणि बारावीनंतरच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत गुरुवारपर्यंतच

एमपीसी न्यूज – राज्यात दहावी आणि बारावीनंतरच्या (Maharashtra) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑप डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 14 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शिक्षण संस्थांमध्ये दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर नियमित विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.

PMPML : आता पीएमपीएमएलही होणार स्मार्ट, बसमध्ये बसवणार यूपीआय स्कॅनिंग कोड

ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी (Maharashtra) प्रवेशासाठीची अंतिम मुदत आणि अन्य सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या. प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत (कॅप) व्यक्तिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत सुरू ठेवल्या जातील.

संस्थास्तरावर कोट्यात किंवा केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ई छाननी पद्धत किंवा प्रत्यक्ष छाननी पद्धती द्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.