Swargate : पीएमपीएमएल बसने प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न; तीन जण अटकेत

एमपीसी न्यूज : हडपसर ते स्वारगेट या मार्गावर  पीएमपीएमएल बसमधून प्रवास (Swargate) करत असताना तीन जणांनी संगणमत करून एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 80 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या समसूचकतेने हा प्रयत्न हाणून पाडला. आणि त्यानंतर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली. स्वारगेटच्या जेधे चौकात 25 ऑगस्ट रोजी हा संपूर्ण प्रकार घडला.

राहुल ईश्वर सिद्धापुरे, विशाल जगन्नाथ शिंदे उर्फ पोसाळ आणि सुरज किसन गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Lonikand Crime : भरधाव वेगातील पीएमटीच्या धडकेत एकाचा मृत्यू

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की फिर्यादी या भेकराईनगर ते कात्रज या बसमध्ये हडपसर वरून स्वारगेटला जाण्यासाठी बसल्या होत्या. यावेळी स्वारगेट येथे बसमधून उतरत असताना आरोपींनी संगणमत करून चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना घेराव घातला आणि त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये (Swargate) किमतीचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र दाताने कट करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.