Swargate : स्वारगेट परिसरात भरधाव कारच्या धडकेत निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सॅलिस्बरी (Swargate) पार्क पार्क परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

शंभूजी लाल (वय 85, रा.गुलटेकडी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशीकला मादीवाना (वय 57) यांनी फिर्याद दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सॅलिस्बरी पार्क परिसरातील (Swargate) पुनावाला गार्डन ते महर्षीनगर पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.

शंभूजी लाल लष्करात होते. निवृत्तीनंतर ते गुलटेकडी परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे ते घरातून बाहेर पडले असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्यांना मयत घोषित केले.

Pune : चतु:श्रुंगी परिसरात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड करत केले तलवारीने वार

स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोळंबीकर पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.