Pune : चतु:श्रुंगी परिसरात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड करत केले तलवारीने वार

एमपीसी न्यूज : चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याने (Pune) दहशत पसरवत वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही तर या टोळक्याने एकावर तलवारीने देखील वार केले आहेत. गोखले नगर परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटकही केली आहे.

योगेश अनंता गायकवाड आणि मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अन्यसाथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुहास सुरेश माने (वय 30, रा. शांतीनगर सोसायटी, सकाळनगर) याने फिर्याद दिली आहे.

NCRB Report : कायदा व सुरक्षिततेच्या यादीत देशात पुणे दुसऱ्या क्रमांकावर, तर प्रथम क्रमांकावर कोलकत्ताची हॅटट्रीक

याबाबत अधिक माहिती अशी की, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे एका सोबत भांडण झाले होते. त्याच रागातून त्यांनी तलवारी उगारून दहशत माजवली.

आरोपींनी जनवाडी परिसरातील तीन दुकानांची तोडफोडही केली. (Pune) दरम्यान दुकानांची तोडफोड होत असल्याचे पाहून सुहास माने हे त्या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी एका आरोपीने त्यांच्या खांद्यावर तलवारीने वार केले. चतु:र्श्रुंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.