Lonikand Crime : भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात धावणाऱ्या पीएमपीएमएलने दुचाकीला (Lonikand Crime ) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 24 ऑगस्टच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील सातव ऑटोमोटिव्ह शोरूम समोर हा अपघात घडला. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम इमाम तांबोळी (वय 49) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल बस चालक मनोज बाजीराव चोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामरान सलीम तांबोळी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे वडील अहमदनगर पुणे रस्त्याने वाघोलीतून जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमटी बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

Sinhagad Crime : माझ्यासोबत चल, नाहीतर तेल फेकेन; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीच्या ऑफिसमध्ये धिंगाणा

यामध्ये सलीम तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि यामध्ये (Lonikand Crime) त्यांचा मृत्यू झाला. लोणीकंद पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.