Sinhagad Crime : माझ्यासोबत चल, नाहीतर तेल फेकेन; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीच्या ऑफिसमध्ये धिंगाणा

एमपीसी न्यूज : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये (Sinhagad Crime) वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या प्रियकराने थेट प्रेयसी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन धिंगाणा घातला. इतकच नाही तर तू माझ्यासोबत बाहेर चल नाहीतर तुझ्यावर तेल फेकेल अशी धमकीही त्याने प्रेयसीला दिली.

सिंहगड रस्त्यावरील सिंहगड कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये 25 ऑगस्टच्या रात्री हा प्रकार घडला. संबंधित प्रियकरावर या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद अर्षद अली (रा. भालदार पुरा बडी मज्जित जवळ नागपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 23 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मागील चार वर्षापासून प्रेम संबंध आहेत. ते दोघेही लिविंग रिलेशनशिपमध्ये राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत.

Sangavi : गोळीबार प्रकरणात सरकारी पंच दिला नाही म्हणून महापालिका व जलसंपदा अधिकाऱ्यांवर गुन्हे

दरम्यान 25 ऑगस्टच्या रात्री फिर्यादी या त्यांच्या कामाच्या ठिकाणी असताना आरोपी त्या ठिकाणी गेला आणि फिर्यादीला आपल्यासोबत चलण्यासाठी जबरदस्ती करू लागला. फिर्यादीने याला नकार दिला असता तू माझ्यासोबत बाहेर आली नाही तर तुझ्यावर तेल फेकेल अशी धमकी दिली.

दरम्यान कॅन्टीन मधील इतर कर्मचारी आरोपीला थांबवण्यासाठी गेले असता त्याने (Sinhagad Crime) त्यांच्या अंगावर काचेची बाटली उगारली आणि शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी या आरोपी सोबत बोलत असताना त्यांनी त्यांच्या कानाखाली मारत तू माझ्यासोबत आली नाही तर स्वतःला काही करेल आणि तुला फसवेल अशी धमकी दिली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.