NCP Crisis : पिंपरी चिंचवड, मावळसह तळेगाव अजित पवार गटात तर पुण्यातील नेते अजूनही संभ्रमात!

एमपीसी न्यूज : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट (NCP Crisis) पडल्याने आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत देखील फुट पडल्याचे वातावरण दिसून येत आहे. जशी ठाकरे घराण्याची बरीच वर्षे मुंबईवर एकहाती सत्ता होती तसेच वर्चस्व राष्ट्रवादीचे पुण्यावर आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने सर्वात जास्त परिणाम हा पुण्यावर झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातही अजित पवार गट अन शरद पवार गट अशी स्थिती निर्माण झाली आहे.

परंपरेने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पूज्य त्रिकुटाशी फार पूर्वीपासून जोडले गेले आहे. तथापि, अजित पवारांसह काही आमदारांनी नुकत्याच केलेल्या बंडामुळे पक्षांतर्गत गोंधळ निर्माण झाला आणि पक्षाचे कार्यकर्ते निश्चित भूमिका घेण्यास कचरले.

पिंपरी चिंचवड मधील आमदारांसाह शहर प्रमुखांनी शहराच्या विकासासाठी अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले. तर, मावळ, तळेगाव सह आमदार अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड, मावळ आणि तळेगावची एकीकडे भूमिका स्पष्ट असताना मात्र पुण्यात अंतर्गत भूमिका अजूनही विभागल्या आहेत. त्यामुळे आता पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद दिसून येत आहे.

Today’s Horoscope 06 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काल झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या बाजूने पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच दीपाली धुमाळ, काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्पष्ट मतभेद पवारांच्या प्रभावशाली (NCP Crisisगटांमधील सत्तासंघर्ष आणि भिन्न निष्ठा यावर प्रकाश टाकतात. राजकीय परिस्थिती जसजशी विकसित होत चालली आहे, तसतसे या अंतर्गत गटबाजीचा पक्षाच्या पुण्यात आणि बाहेरील भविष्यावर कसा परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.