NEET Exam : नीट परीक्षा अर्ज प्रक्रियेला सुरुवात

एमपीसी न्यूज – बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (NEET Exam) प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (NEET) 5 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली आहे. एमबीबीएस, बीएएमएस अशा विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी नीट युजी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. चार वर्षांचा अभ्यासक्रम असणार्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देखील नीट परीक्षा द्यावी लागणार आहे.

Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर ; आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा

5 मे रोजी ही परीक्षा होणार असून याचा निकाल 14 जून रोजी लागणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये देता येते. त्यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश आहे. नीट परीक्षेसाठी अभ्यासक्रम, शुल्क आदींचा तपशील जाहीर झाला असून 9 मार्च पर्यंत अर्ज केल्यानंतर अर्जातील दुरुस्तीसाठी देखील संधी मिळणार (NEET Exam)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.