New Delhi : ‘गरिबीवर वार…. 72 हजार !’ असे म्हणत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज- देशभरात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच आज, मंगळवारी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा करण्यात आलेली नाही असे म्हणत सत्य आणि न्यायाची घोषणा करत रोजगार, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आणि महिलांना न्याय मिळवून देणारा जाहीरनामा असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. ‘गरिबीवर वार…. 72 हजार !’ असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी यांच्याह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात न्याय, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे हित या पाच गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.