Shirur : खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या शिरूर तालुक्यातील प्रचार दौरा सुरु

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील तळेगाव ढमढेरे येथून प्रचार दौ-याला प्रारंभ झाला. गावक-यांनी प्रचंड जल्लोषात आढळराव यांचे स्वागत करून सत्कार केला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार बाबुराव पाचर्णे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख जयश्री पलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पुणे अनिल काशीद, शिवसेना तालुका प्रमुख पोपट शेलार, भगवान शेळके, अमृता पठारे तसेच महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.