New Delhi : कामगार चळवळीचे अध्वर्यू जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

एमपीसी न्यूज-  देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (वय 88) यांचे आज वृद्धापकाळानं निधन झाले. फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळं देशातील कामगारांसाठी झुंजणारा ‘योद्धा’ हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती.

आणीबाणीच्या काळानंतर काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात जॉर्ज फेर्नांडीस हे उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना केली. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते.

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी मंगळुरु येथे झाला. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली 8 मे 1974 रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. तेथून फर्नांडिस यांचे नेतृत्व उदयास आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.