Nigdi : विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह (Nigdi) आढळला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास साईनाथ नगर, निगडी येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नगर येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे 40 ते 45 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत होता. महिलेची चप्पल विहिजवळ मिळून आली आहे.

Dehuroad : तीन श्वानांचा क्रूरपणे छळ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. महिलेच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे महिलेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस (Nigdi) तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.