Nigdi : सनदी लेखापाल अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण दुवा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – अर्थव्यवस्थेतील महत्वपुर्ण दुवा म्हणून सनदी लेखापाल यांना (Nigdi) संबोधले जाते.आजच्या शिबिरातील लेखा आणि वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असून त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना निश्चितच एखाद्या नामांकित कंपनीत किंवा संस्थेत मोठ्या हुद्द्यावर काम मिळेल तथापि त्यांनी या कामासोबतच आपला थोडा वेळ समाजसेवा करण्यासाठीही द्यावा असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 8 व 9 जुलै रोजी लेखा आणि वित्त क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेगा परिषदेचे आयोजन महापालिकेच्या सहाय्याने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. आमदार महेश लांडगे, माजी नगरसदस्य एकनाथ पवार, शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

Talegaon : किशोर आवारे खून प्रकरणातील मास्टर माईंड खळदे याला नाशिक मधून अटक

या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महापालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठिया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष रणजित आगरवाल,  सनदी लेखापाल मंगेश किनरे,पिंकी केडीया  अशोककुमार पगारीया,  पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सचिन बंसल, पंकज पाटणी,  वैभव मोदी, अक्षय बाहेती, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे विद्यार्थी कौशल्य संवर्धन मंडळाचे अध्यक्ष मंगेश किनरे, उपाध्यक्ष श्रीधर मुप्पाला, परिषद संचालक पियुष छाजेड उपस्थित होते तसेच लेखा आणि वित्त क्षेत्रातील शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक उपस्थित होते.

सनदी लेखापाल त्याप्रमाणे उद्योग तज्ञांशी संवाद साधून सविस्तर मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी या दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने  करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विविध सनदी लेखापाल तसेच उद्योग तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी संवाद देखील साधला.

त्यामध्ये सनदी लेखापाल सी. व्ही. चितळे यांनी कर आकारणीबद्दल तसेच डिजीटल मालमत्तेचे कर आकारणी आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन याबद्दलही मार्गदर्शन केले. त्यानंतर सनदी लेखापाल जय छायरा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांबद्दल आणि भविष्यातील उज्ज्वल संधींबद्दल मार्गदर्शन केले.

दुपारच्या तांत्रिक सत्रामध्ये सनदी लेखापाल अभय छाजेड यांनी लेखा आणि लेखापरिक्षण मानंकांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये  आर्थिक फसवणूक कशी टाळावी आणि कर संपादन कायद्यातील तरतूदीबाबत सविस्तर  माहिती त्यांनी दिली.
या परिषदेचा पहिला दिवस आज उत्साहात पार पडला.

या परिषदेत देशभरातून 500 सीए विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्या देखील शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये सनदी लेखापाल उमेश शर्मा, जिगर दोशी,अर्पित काबरा, राजेश शुक्ला आणि अरविंद खिंवसरा मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी  शहरातील, लेखा व वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या तसेच संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या शिबीराचे प्रास्ताविक  वैभव मोदी यांनी तर सूत्रसंचालन रुची बंसल,निधी कट्टी यांनी केले तर आभार पंकज पाटणी यांनी (Nigdi) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.