Nigdi : जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य,गायन, वादन स्पर्धा

एमपीसी न्यूज – नेहरु युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य, गायन, वादन स्पर्धांचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत नृत्य स्पर्धा या शास्त्रीय नृत्य, फिल्मी नृत्य, वेस्टर्न नृत्य या नृत्य प्रकारात गायनात शास्त्रीय व सुगम संगीत प्रकार व वादनांत तबला, हार्मोनियम, सतार अशा विविध प्रकारात स्पर्धा होणार आहे. हे स्पर्धेचे 11 वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेणा-या सर्व स्पर्धकांना नेहरु युवा केंद्र भारत सरकारच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पहिल्या तीन क्रमांकाना ट्रॉफी व भारत सरकार, नेहरु युवा केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाछी नंदकिशोर कल्चरल सोसायटी, सेक्टर – 21, यमुनानगर, निगडी या संस्थेच्या कार्यालयात किंवा 9371099911 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.