Pimpri : रिक्षाचालकांना सन्मानाने जगता यावे एवढे निश्चित उत्पन्न मिळाले पाहिजे -अनुप मोरे

एमपीसी न्यूज – रिक्षाचालक समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वयंरोजगार करणारा हा घटक आहे. रिक्षाचालकांना निश्चित उत्पन्न मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत भाजप माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न सुराज्य रिक्षा स्टँडचे उदघाटन नगरसेवक शेखर चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेवक राजेंद्र गावडे, माऊली सूर्यवंशी, राजाभाऊ चिंचवडे,अमर गावडे, पंचायतीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, विभाग अध्यक्ष अजित बराटे, कासम बागवाले आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात सात हजार नवीन रिक्षा आल्या आहेत. त्यामुळे रिक्षा व्यवसायात स्पर्धा वाढत असून रिक्षाचालकांचे आर्थिक प्रश्न बिकट होत आहेत, त्यांना निश्चित उत्पन्न मिळावेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

  • त्यानंतर माऊली सूर्यवंशी म्हणाले, मी देखील एकेकाळी रिक्षा चालवत होतो. नागरिकांची सेवा केल्यामुळे माझी पत्नी नगरसेविका झाली, अशीच सेवा रिक्षाचालकांनी केली पाहिजे.

रिक्षाचालकांना महानगरपालिकेच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन नगरसेवक शेखर चिंचवडे यांनी दिले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष प्रवीण बोबडे, नितीन पाटोळे, सिद्धू जानकर, संतोष चिघळीकर, महेश पिल्ले, अखिलेश येवले, बालाजी घरत, नितीन चौधरी, अनिल वायकुळे, संदीप कांबळे, नागेश सदावर्ते यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.