Pune : रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा देण्यासाठी बनवले स्वतःचे ‘ओ रिक्षा’ ॲप

एमपीसी न्यूज – सुरक्षित आणि वाजवी दरात ऑटोरिक्षा सेवा देण्याच्या (Pune) उद्देशाने पुण्यात ओएनडीसी-सक्षम ‘ओ रिक्षा’ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप शहरातील रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांना ओपन नेटवर्कवर थेट जोडणार आहे. पुण्यातील 12 हजारांहून अधिक रिक्षाचालक फेडरेशनचा भाग असून, ते ‘ओ रिक्षा’ ॲप वर उपलब्ध असतील.

‘ओ रिक्षा’ ॲपचे उद्घाटन ओएनडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. कोशी, ग्राहक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, ग्राहकपेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, सुमा सॉफ्टचे संचालक सुरेंद्र ब्रह्मे, एन्ड माईल कडरेशनचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले.

PMC : पालिका अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल, पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर – मुकुंद किर्दत

सरकारी मालकीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ONDC वर असलेल्या प्लॅटफॉर्मवर रिक्षा चालकांना एकत्रित करण्यासाठी फेडरेशनने ओ रिक्षा हे ॲप विकसित केले आहे. 12,000 हून अधिक ऑटोरिक्षा चालक, जे या महासंघाचा भाग आहेत, ॲपवर ऑन-बोर्ड असतील. दोन-तीन महिन्यांत आणखी 35,000 रिक्षाचालक जोडण्याची योजना सुरू आहे. फेडरेशनने सांगितले की, ते फक्त आरटीओने अधिकृत (Pune) केलेल्या रिक्षा समाविष्ट करेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.