Pune : रिक्षाचालकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना घडवले दगडूशेठ हलवाईचे VIP दर्शन

एमपीसी न्यूज – टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुणे नवी पेठ येथील (Pune) निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणेश दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्ध व निराधार नागरिकांना तीव्र इच्छा असून देखील गणपतीमध्ये गणेश दर्शनाला घेऊन जाण्यास कोणीही उपलब्ध नसते.

Dehu Road : मुकाई चौकातून होर्डिंगचा सांगाडा चोरीला
त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमातील १०० आजी आजोबांना टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुण्यातील गणेशोत्सवातील ” गर्दीतून वाट काढण्यास प्रसिद्ध ” असणाऱ्या ४० रिक्षाचालकांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे VIP दर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

वृद्धाश्रमात राहिला आल्यापासून पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेत असल्याचे अनेक आजी आजोबांनी सांगितले. एक आजी बोलल्या आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की अश्याप्रकारे गणपतीत दगडु शेठ हलवाईचे दर्शन व आरती करायला मिळू शकेल. गणपती दर्शनाला जायचे म्हणून सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून आवरून ज्येष्ठ नागरिक तयार होते. अनेकांनी गणपती बाप्पाच्या घोषणा दिल्या व काहींनी ठेका धरला.

आजी आजोबांचा आनंद बघून रिक्षाचालकांना केलेल्या कष्टचे चीज झाल्याचा व स्वतच्या आजी आजोबांना गणपती दर्शनाला नेल्याचा आनंद मिळाला. डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला होता. व तो यशस्वी व्हावा म्हणून फय्याज मोमीन , कमलेश गवळी , गोपाळ बांदल, जयश्री अब्राहम , सोनी शेंडगे व इतर रिक्षाचालकांनी मेहनत घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.