Pune : पुण्यात ढोल ताशाच्या गजरात वर्ल्डकप रॅलीचं जंगी स्वागत

ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव सहभागी 

एमपीसी न्यूज – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबर पासून ( Pune ) सुरू होते आहे. वर्ल्ड कप कोण जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी विश्वचषकाचे पुण्यात अनावरण केले. त्यानंतर सेनापती बापट रोड येथून विश्वचषकासोबत भव्य अशी रॅली काढण्यात आली.

Dehu Road : मुकाई चौकातून होर्डिंगचा सांगाडा चोरीला

या रॅलीत ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सेनापती बापट रोड ते शेतकी महाविद्यालय दरम्यान रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे हजारो पुणेकर नागरिकांनी ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात केले. तर ‘जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा आणि भारत माता की जय’ हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार म्हणाले की, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तसेच आपल्या देशात वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आला असून त्याबद्दल विशेष आनंद होत आहे.

गहुंजे येथील स्टेडियमवर पाच सामने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. पुण्यासह जगभरातील क्रिडाप्रेमी गहुंजे स्टेडियम येथे होणार्‍या सामान्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावतील ,अशा विश्वास यावेळी त्यांनी ( Pune ) व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.