Dehu Road : मुकाई चौकातून होर्डिंगचा सांगाडा चोरीला

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लावलेल्या (Dehu Road) होर्डिंगचा लोखंडी सांगाडा अज्ञातांनी कापून चोरून नेला. ही घटना 5 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मुकाई चौक, येथे घडली.
संतोष शंकर कुंभार (वय 45, रा. वाकड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एसटी बस डिव्हाइडरवर आदळली; प्रवासी सुखरूप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कन्सेप्ट मिडिया कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीने मुकाई चौकात जाहिरातीसाठी लोखंडी मोठे होर्डिंग उभारले आहे.
अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 56 हजार रुपये किमतीचे 30 फूट उंचीचे होर्डिंगचे लोखंडी पिलर कापून चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत (Dehu Road) आहेत.