Pimpri : नेपाळी मार्केटमधील व्यापा-यांना नाममात्र भाडेही नको, गाळ्यांचे वाटप रखडले

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या पिंपरीतील नेपाळी ( Pimpri ) मार्केटमधील फेरीवाल्यांसाठी मेट्रोने 100 गाळे बांधून दिले आहेत. गाळे बांधून वर्ष होऊन गेले. त्यानंतरही या गाळ्यांमध्ये व्यापारी अद्याप स्थलांतरित झाले नसून वर्षभरापासून भिजत घोंगडे कायम आहे. दररोज दोन ते तीन हजार रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना नाममात्र भाडे नको असून पूर्णतः मोफत गाळे हवे आहेत. दुसरीकडे मेट्रोला जागेची आवश्‍यकता असल्याने व्यापाऱ्यांना नवीन गाळ्यांमध्ये स्थलांतर करण्याची सूचना केली असताना व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे स्थलांतर रखडले आहे.

मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या पिंपरी, मोरवाडी चौकालगत नेपाळी मार्केटमधील ( Pimpri ) व्यापाऱ्यांसाठी पुणे महामेट्रोने 100 गाळे बांधून दिले आहेत. हे गाळे महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडे सुमारे एक वर्षभरापूर्वीच हस्तांरित झाले आहेत. पात्र व्यापाऱ्यांना पाच वर्षांसाठी भू भाडे, हॉकर्स फी म्हणून जीएसटीसह 88 हजार 775 रूपये भरण्यास महापालिकेने सांगितले आहे.

Pune : पुण्यात ढोल ताशाच्या गजरात वर्ल्डकप रॅलीचं जंगी स्वागत

यासाठी व्यापाऱ्यांना चार हप्त्यामध्ये पैसे भरण्याची सवलतही देण्यात आली. तसेच गाळेधारकांबरोबर 5 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. मात्र, यापैकी 22 व्यापाऱ्यांनी चार हप्ते, 17 जणांनी तीन, 26 जणांनी दोन तर 28 जणांनी फक्त 1 हप्ता तर 7 जणांनी एकही हप्ता ( Pimpri ) भरला नसून 1 दुबार व 1 व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या व्यापाऱ्यांना पैसे भरण्यासाठी वेळोवेळी आवाहन महापालिकेने केले. मात्र, व्यापारी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसादच देत नसल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती आणि मोरवाडी चौकालगत महापालिकेची ( Pimpri ) जागा आहे. चौकातच मेट्रो स्टेशन, महापालिकेचे कार्यालय, बाजारपेठ अशा मध्यवर्ती ठिकाणी नेपाळी मार्केट आहे. या जागेची मेट्रोला आवश्‍यकता असल्याने व्यापाऱ्यांसाठी मेट्रोने जवळच्या जागेतच तात्पुरत्या स्वरूपात 100 गाळे बांधून दिले आहेत.

पात्र व्यापाऱ्यांकडून पाच वर्षांसाठी भू भाडे, हॉकर्स फी म्हणून जीएसटीसह 88 हजार 775 रूपये भरण्यास महापालिकेने सांगितले आहे. मात्र, यामध्ये काही व्यापाऱ्यांनी पूर्ण पैसे भरले तर काहींना एक रूपया भरला नाही. आता तर व्यापाऱ्यांना गाळे मोफत हवे आहेत. मात्र, कायद्यातच मोफत गाळे देण्याची तरतूद नाही. कमीत-कमी एका गाळ्यासाठी पालिका 2300 रूपये दरमहा भाडे आकारू शकते. असे असताना व्यापाऱ्यांना मोफत गाळे हवे असल्यामुळे या गाळांचे भिजत घोंगडे ( Pimpri ) कायम आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.