Hinjwadi : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी घराबाहेर नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले. हा प्रकार रविवारी (दि. 24) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 25) मध्यरात्री दोन वाजताच्या कालावधीत हिंजवडी (Hinjwadi) येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तात्या निरंजन मोरे (वय 43, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घराबाहेर बोलावले. तिचा हात धरून ओढत नेत एका खोलीत बंद केले. तिथे तिच्यासोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.