Pimpri News : शहरात रिक्षा बंदला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी (Pimpri News) संपात सहभाग घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने पिंपरी ते पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत रॅली काढली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात करण्यात आली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे शहराध्यक्ष सोमनाथ कलाटे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब ढवळे, रवींद्र लंके, सुरेश सोनवणे, दिनेश तापकीर, तुषार लोंढे, निलेश लंके, अविनाश जोगदंड, हिरामण गवारे आदीसह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News : दुकानातून कामगारानेच चोरला सात हजाराचा पाईप

रॅलीच्या सुरूवातीला पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अधिकारी अतुल आदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.(Pimpri News) त्यानंतर पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरू असूनही जोपर्यंत मागण्या मान्य होते नाही  तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, लोकशाही व शांततेच्या मार्ग सुरू ठेवावे.

खाजगी कंपन्यांचा प्रवासी वाहतूकीमध्ये सहभाग वाढल्याने रिक्षा, टॅक्‍सी चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यात भरीस भर म्हणून रॅपीडो बाईक प्रवासी वाहतूक करत आहेत. या बाबत वारंवार तक्रार करूनही आरटीओ कार्यालय, शासनाचे अधिकारी व नेतेमंडळी दखल घेत नाहीत.(Pimpri News) त्यामुळे रॅपीडो बाईक पुर्ण बंद होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशाराही आंदोलक रिक्षा चालकांनी  दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.