Pune News : चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसला, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : झोपेत असणाऱ्या चिमुरडीला एका 35 वर्षीय मद्यपीने उचलून नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करणार इतक्यात एका सतर्क व्यक्तीमुळे हा संपूर्ण प्रसंग टळला..(Pune News) पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.. या नराधमाला रंगेहात पकडण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी राम टेकबहादुर (वय 35, रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने आईच्या खुशीत झोपलेल्या या चिमुरडीचे झोपेत अपहरण करून तिला उचलून नेले. जवळच असलेल्या पडीक बांधकामाच्या बेसमेंटमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, या सतर्क नागरिकाने चिमुरडीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचा माग काढला अन् बलात्काराचा प्रयत्न फसला. बेवड्या नराधमापासून चिमुरडीची सुखरूप सुटका करत त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले.

Pimpri News : शहरात रिक्षा बंदला प्रतिसाद

या खळबळजनक घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, बंद पडक्या इमारतीचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Pune News) नवनाथ अडागळे असे या अत्याचाराला लगाम लावण्यात आणि नराधम्याला रंगेहात पकडणाऱ्या सतर्क नागरिकाचे नाव आहे. त्यांचे पोलीस व नागरिकांनी विशेष कौतुककरून आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.