Pune News : रिक्षा बंदमुळे नागरिकांची गैरसोय, पीएमपीएमएलच्या 100 जादा बसेस ऱस्त्यावर

एमपीसी न्यूज : रिक्षा बंद असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) आज 100 जादा बसेस रस्त्यावर धावत आहेत. अशी माहिती दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनांनी बाईक टॅक्सी विरोधात बेमुदत आंदोलन सुरू केलेले आहे. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे 80,000 व पिंपर- चिंचवड शहरातील सुमारे 20,000 रिक्षा चालक या अंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

Pune News : चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसला, आरोपीला अटक

हा नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीएल काय करत आहे, असे विचारले असता झेंडे म्हणाले की, ” पीएमपीएल मार्फत दररोज 1700 बसेस पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच आसपासच्या परिसरात चालविल्या जातात. आज रिक्षा बंद असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तो कमी करण्यासाठी आम्ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या बाहेर चालणाऱ्या 100 बसेस कमी करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जादाच्या बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या जादा बस सेवेला नागरिकांचा खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे असंही झेंडे म्हणाले.

रिक्षा संघटनांचे हे आंदोलन बेमुदत असल्यामुळे आणखी जास्त दिवस चालण्याचे शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागेल.(Pune News) त्याबाबत विचारले असता, झेंडे म्हणाले की, ” जर उद्याही आंदोलन चालूच राहिले तर आम्ही उद्याही 100 ज्यादा बसेस नागरिकांच्या सोयीसाठी चालवू. ”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.