Nigdi: स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रध्वज फडकत ठेवा; अन्यथा आयुक्तांवर अवमानाचा गुन्हा दाखल करु – दत्ता साने

एमपीसी न्यूज – निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात 15 ऑगस्टपर्यंत राष्ट्रध्वज फडकत ठेवावा. अन्यथा आयुक्तांवर राष्ट्रध्वज अवमानाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात साने यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहराची शान म्हणून भक्ती-शक्ती चौकात देशातील सर्वांत उंच असा 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज 26 जानेवारी 2018 रोजी उभारण्यात आला. मात्र हा ध्वज अखंडपणा फडकता ठेवला जात नाही. वा-यामुळे हा ध्वज फाटत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रध्वज बसविण्याची मागणी केली. तथापि, पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.

शहराची नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी हा ध्वज उभारला गेला. पर्यटकांसाठी सुद्धा ते एक आकर्षण ठरले होते. मात्र वारी दरम्यान शहरातून राज्यभरातील वारकरी भेट देऊन गेले त्यांनाही तो ध्वज दिसला नाही. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. शहरवासीयांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासानाने शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिनी पुन्हा फडकवावा अशी मागणी साने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.