Nigdi : बसमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – मुंबई ते निगडी असा प्रवास करत असताना समोरच्या आसनावर बसलेल्या 22 वर्षीय तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

अकबर मोहम्मद जहांगीर (वय 39, रा. धारावी, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पिडीतेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मुंबईवरून निगडीला येण्यासाठी सोमवारी (दि. 4) सकाळी साडेसात वाजता बसमध्ये बसली. त्यांच्या पाठीमागच्या आसनावर आरोपी बसला होता. आरोपीने आसनाच्या गॅपमधून पिडीतेच्या पाठीला हाताने स्पर्श केला. तसेच त्याने पीडित तरुणीशी अश्लील वर्तन केले.

याप्रकरणी पिडीतेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निगडी पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.