Akurdi : शिबिरातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते-प्राचार्य ए.एम. फुलंबरकर

पीसीईटीचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रम आणि संस्काराचे महत्व कळते. तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामिण भागातील भौगोलिक, सामाजिक, नैसर्गिक, परिस्थिती अभ्यासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजन शिबिरांचा उपयोग होतो. अशा शिबिरातूनच विद्यार्थ्यांना संघटन आणि श्रमाचे महत्व कळते. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व विकसीत होते. असे मार्गदर्शन प्राचार्य ए.एम. फुलंबरकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), रावेत येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) आणि तळेगाव येथील नुतन महाराष्ट्र इन्स्टिट्‌युट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांचे एकत्रित राष्ट्रीय सेवा योजन (एनएसएस) निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर मावळ तालुक्यातील माउ वडेश्वर येथे संपन्न झाले.

या शिबीराअंतर्गत गावात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, बंधारा बांधण्याचे उपक्रम करण्यात आले. शिबिरप्रसंगी प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्राचार्य ललितकुमार वाधवा यांनी भेट देऊन शिबीरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप माउ वडेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या स्नेह संमेलनाने झाला.

शिबिर नियोजनात प्रा. निखिल सुरावडे, प्रा. तुषार गायकवाड, प्रा. तुषार म्हस्के यांनी सहभाग घेतला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.