Dighi : जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाला बेल्टने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या वादातून दिघी येथील डोगराच्या पायथ्याजवळ रविवारी (दि.3) एका 25 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी सागर अप्पाराव चोयणे (वय-25 रा.गणेशनगर, बोपखेल) याने फिर्याद दिली असून ओंकार कुमार आणि त्याच्या सथीदारावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून ओंकार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सागर याला दिघी येथील डोंगराच्या पायथ्याला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कमरेच्या बेल्टने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी दिघी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.