Pimpri : होतकरू खेळाडूंना सर्वतोपरी मदत करु – आमदार संग्राम थोपटे

पैलवान शिवाजी वाकळे यांचा हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – पैलवानांचा तालुका म्हणून मुळशीची ओळख आहे तर आयटी हब म्हणून सातासमुद्रापार लौकिक मिळविलेल्या हिंजवडीतील मल्लांनी कुस्तीत तालुक्याचे देशात नाव करावे, यासाठी उमद्या, होतकरु, मेहनती मल्लांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने वर्धा येथे झालेल्या सब ज्युनियर गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात दैदिप्यमान कामगिरी करणा-या मल्ल शिवाजी वाकळे यांचा हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते.

  • यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, मुन्नालाल शेख, पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, कुलदीप कोंडे, शांताराम जांभूळकर, गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडेपाटील, दत्तात्रय साखरे, नंदकुमार भोईर, मल्हारी साखरे आदी उपस्थित होते.

पै. शिवाजी वाकळे याची हिंजवडी गावठाणापासून मिरवणूक काढण्यात आली. हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सन्मान करण्यात आला. आशा बुचडे आणि उमाजी बुचडे यांच्या वतीने बक्षिस स्वरूपात ५ लाख ५५५ रोख रक्कम देण्यात आली तर नुकताच एमबीबीएस पदवी प्रॉत डॉ. सुशांत शशिकांत कदम आणि कुस्ती खेळाडू शीतल हिरामण साखरे या दोघांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

  • उपसरपंच राहुल जांभूळकर युवा मंच, उपसरपंच कृष्णादादा बुचडे युवा मंच सुरेश हुलावळे, संतोष साखरे, शामराव हुलावळे, प्रविण जांभुळकर, गणेश जांभुळकर, प्रदीप साखरे, उमेश साखरे, शिवनाथ जांभुळकर, आबा जांभुळकर, रामभाऊ माझिरे, संदीप साखरे, शरद जांभुळकर, गणेश बोरकर, सुरज जांभुळकर, कुंडलिक जांभूळकर यांनी आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.