Pimpri : मुंबई-बेंगलोर महामार्गावर दुभाजक बसवा; ह्युमन राईटस असोसिएशनची मागणी

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्ग येथील दुभाजक तोडफोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तरी नवीन दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिएशनने केंद्रीय रस्ते महामंडळाचे विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

  • या दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे, ताथवडे चौक ते पुनावळे चौक या दरम्यान दुभाजक खूप मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ५०० मीटरच्या अंतरावर ५ ते ६ ठिकाणी हे दुभाजक तोडलेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब होऊन मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तरी येथे नवीन दुभाजक बसविण्यात येऊन सर्व्हिस रोड आणि एक्सप्रेस वे मधील रस्ता बंद करण्यात यावा.

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरिक्षक रामराव नवघन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर आदी निवेदन देताना उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.