Nigdi : ‘कॅप जेमिनी’कडून 207 विद्यार्थ्यांना दिल्या नोकऱ्या

पीसीईटी - नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अभिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पीसीईटी – नूतन ग्रुपच्या पीसीसीओई (निगडी), पीसीसीओईआर (रावेत) नूतन महाराष्ट्र (तळेगाव) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंट मुलाखती नुकत्याच सुरु झाल्या आहेत. त्यातील कॅप जेमिनी या कंपनीने एकाच दिवशी 207 विद्यार्थ्यांना 6.8 लाख आणि 3.8 लाख वार्षिक पगाराचे पॅकेज दिले, अशी माहिती पीसीईटी – नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अभिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.

रोजगार निर्मितीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या पीसीईटी – नूतन ग्रुपतर्फे आतापर्यंत सुमारे 21 हजारांहून अधिक अभियंत्यांना नोक-या मिळवून दिल्या आहेत. मागील वर्षी सुमारे 400 नामांकित कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी मेकॅनिकल, सिव्हील, ई. अँड टी. सी., कॉम्प्युटर, आयटी आदी शाखांमधील 775 अभियंत्यांना नोकरीची संधी दिली. यामध्ये ॲमेझॉन कंपनीने 28 लाख रुपये, क्रेडिटसूस कंपनीने 10 लाख रुपये, क्वांटिफाय कंपनीने 9.5 लाख रुपये अशा भक्कम पगाराच्या नोकरींची संधी दिली आहे.

  • त्यासोबतच केपीआयटी, एल ॲन्ड टी., अल्फा लावल, गोदरेज, थरमॅक्स, फोक्सवॅगन, ॲटलास कॉप्को, केएसबी आदी शेकडो कंपन्यां कॅम्पस प्लेसमेंटसाठी दरवर्षीप्रमाणे दाखल झाल्या होत्या. सर्व क्षेत्रातील आघाडीवर असणा-या कंपन्यांमध्ये 3 लाखांपासून 32 लाखांपर्यंतच्या वार्षिक पगाराच्या नोक-या दिल्या जात असल्याचे प्रा. रवंदळे यांनी सांगितले.

कॅप जेमिनी कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, नूतन संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, अधिष्ठाता विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.