Nigdi : महिला विहार सेविकांचा ‘विहार सौदामिनी’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी-प्राधिकरण (Nigdi) यांच्या वतीने पीसीएमसी विहार सेवा ग्रुप चिंचवड अंतर्गत कार्यरत महिला विहार सेविकांना विहार सौदामिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे दक्षिण चंद्रिका साध्वी डॉ. संयमलताजी म. सा. आदी ठाणा चार यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. देहूरोड ते दापोडी व आळंदी ते थेरगाव दरम्यान 11 गावांमध्ये येणाऱ्या जैन साधू – साध्वीजींना त्यांचा चातुर्मास पूर्ण झाल्यानंतरच्या काळात सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी या विहार सेविका काम करतात.

Pune : पुण्यात 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार 69 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

या विहार सेविका त्यांची कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करून पहाट 5 ते सकाळी 8 व दुपारी 3 ते 5 या वेळेत या धर्म कार्यामध्ये (Nigdi) सहभागी होतात. त्यांच्या या अभिमानास्पद कार्याचा कौतुक सोहळा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे (निगडी-प्राधिकरण) अध्यक्ष नितीन बेदमुथा व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला चातुर्मास कमिटी अध्यक्ष मनोहरलाल लोढा यांचे विशेष सहकार्य लाभले.

संघाचे कार्याध्यक्ष मनोज सोळंकी, स्वागताध्यक्ष राजेंद्र मुनोत, महामंत्री सुभाष ओसवाल, खजिनदार संतोष गुगळे, अनुप मुनोत, नीलेश नहार, संजय खाबिया, श्रेणिक मंडलेचा, संतोष लुंकड, संगीता लुंकड यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.