Moshi : गाडीला धक्का दिला म्हणून नगरिकाला मारहाण करत वार, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज : गाडीला धक्का दिला म्हणून पाच ते सहा जणांच्या (Moshi) टोळक्याने तरुणाला लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री मोशी येथे घडली.

याप्रकरणी अरुण दगडू वाघमारे (वय 55 रा.वाकड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अनिकेत अनिल नवगिरे (वय 20) भावेश वासुदेव संगणे (वय 20) रोहन प्रदीप साह (वय 20) तेजस निलेश गायकवाड (वय 19) मेघराज नाना ताकतोडे (वय 19) हनुमान महादू चव्हाण (वय 20, सर्व राहणार चिखली) यांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nigdi : महिला विहार सेविकांचा ‘विहार सौदामिनी’ पुरस्काराने गौरव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपी दोन दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांचे दुचाकी अडवली. त्यांना ढकलून देत आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच आमच्या गाडीला धक्का का मारला म्हणून त्यांनी जाब विचारत फिर्यादी यांच्यावर हत्याराने वार करत लाथा बुक्क्यांनी (Moshi) मारहाण करून त्यांना जखमी केले.

महाराणी नंतर आरोपी यांनी फिर्यादी यांच्या खिशातून सात हजार रुपयांचा मोबाईल व रोख दीड हजार रुपये काढून घेते तिथून पसार झाले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.