Nigdi News : महाराष्ट्र वितरक सेनेच्या शिबिरात 56 पिशव्या रक्तसंकलित

एमपीसीन्यूज : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र वितरक सेनेच्या (Maharashtra Vitrak Sena)  वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 56 पिशव्या रक्तसंकलित( Bolld collect)  झाले.

महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे ( Maruti Salunkhe)  व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने त्रिवेणीनगर येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिवसेना सहसंपर्कप्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर व उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पुजन करुन शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढी (Dr. D. Y. Patil Blood Bank )मार्फत आयोजित या शिबिरात एकूण 56 दात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हा सरचिटणीस वैभव विक्रम छाजेड यांनी रातदान शिबिरासाठी पुढाकार घेतला होता.

महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी संयोजन केले. केले. यावेळी जितेंद्र यादव, सर्जेराव भोसले, दादा नरळे, दयानंद भालेकर, रविंद्र सोनवने, संभाजी बालघरे, गोविंद बालघरे, महेन्द्र सिंह शेखावत, बाळासाहेब नाखाडे, गणेश भुजबळ, संजय यादव, गणेश जाधव, सुर्यकांत पोळ आदी उपस्थित होते.

शिबीर यशस्वी करण्यासाठी संदीप आखाडे, संतोष गावडे, चेतन सावंत, वैभव थोरात, अवधूत जाधव, कळमकर आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like