Chikhali News : कोरोना योद्धया पोलिसांना फळ वाटप करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा

एमपीसीन्यूज : कोरोना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फळ वाटप करून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हा सरचिटणीस वैभव छाजेड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबण्यात आला. या उपक्रमांतर्गत चिखली पोलीस ठाणे आणि साने चौकी येथील पोलिसांना फळ वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाकाळातील त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात, तसेच संजय गाढवे, आबा पांचाळ, विजय ढगारे, प्रभाकर कळमकर, बाळासाहेब नाखाडे, सदीप आखाडे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.