Chikhali : विश्व श्रीराम सेनेतर्फे आयोजित रामजन्मोत्सवाला भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज –  चिखलीमध्ये श्री रामनवमी मोठ्या भावभक्तीने उत्साहात साजरी करण्यात (Chikhali)आली. विश्व श्रीराम सेनेतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. लालबाबू गुप्ता आणि त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमाचे प्रतिवर्षाप्रमाणे नेटके नियोजन केले. या वर्षी अयोध्येतील मंदिरात विराजमान झालेल्या रामललाच्या मूर्तीची अयोध्येहून आणलेली हुबेहूब प्रतिकृती यावर्षीच्या रामनवमी उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली.

विश्व श्रीराम सेनेतर्फे चिखली येथे 16 व 17 एप्रिल रोजी श्री रामनवमी निमित्त (Chikhali)रामजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 16 एप्रिल रोजी या उत्सवाच्या निमित्ताने गोस्वामी तुलसीदास लिखित श्री रामचरित मानस या ग्रंथाचा अखंड पाठ सुरू करण्यात आला होता. त्याचे समापन आज 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता झाले. त्यानंतर रामजन्मोत्सवाचा सोहळा झाला.दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खास तयार केलेल्या चांदीच्या पालखीतून रामललाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. कडाक्याचे उन्ह असूनही या मिरवणुकीत शेकडो भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी मिरवणुकीच्या स्वागतार्थ मार्गावर रंगावली काढून आणि पुष्पवर्षाव करून रामलला प्रति आपली भक्तीपूर्ण सेवा रुजू केली.

या मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या उंट आणि अश्वांनी मिरवणुकीची शोभा वाढविली. जय श्रीरामच्या जयघोषात पालखीत बसलेल्या रामलल्लाची मिरवणूक काढण्यात आली. अयोध्या येथील राममंदिरात विराजमान असलेल्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती फुलांनी सजवलेल्या विशाल रथात स्थानापन्न झाली होती. तर, पुढे दुसऱ्या रथात श्री राम, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेला बालचमू आरुढ झाला होता. यंदा रामललाच्या अयोध्येतील प्रतिकृतीमुळे रामभक्तांना या वर्षी अयोध्येतील रामललाच्या साक्षात दर्शनाचा लाभ मिळाल्यासारखे वाटले.उत्सवादरम्यान असलेल्या महाप्रसादाचा लाभही अनेक भाविकांनी घेतला.

Chinchwad : एकदा संधी द्या, मावळचा कायापालट करून दाखवू – संजोग वाघेरे

विश्व श्रीराम सेनेतर्फे डॉ. लालबाबू गुप्ता गेली अनेक वर्षे श्री रामनवमीच्या सोहळ्याचे चिखली येथे आयोजन करीत आहेत. या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  विश्व मैत्री संघाच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गुप्ता, डॉ.पुष्पा गुप्ता, साधना गुप्ता, रिंटू गुप्ता, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, बच्चा गुप्ता, रोहित गुप्ता यांनी विशेष प्रयत्न केले.

या रामजन्म सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेणार्‍या मान्यवरांमध्ये  भारतानंद सरस्वती महाराज, अशोक महाराज पवार, लटके महाराज, आरएसएसचे विश्राम कुलकर्णी, अनिल उपाध्याय, श्यामराव कुलकर्णी, नीलेश आंधळे, मिलिंद एकबोटे, उद्योगपती देवानंद गुप्ता, चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर वारकरी संप्रदायाचे अमोल महाराज जाधव, पांडाभाऊ साने, नेताजी काशीद, मनोज जरे, मनोज गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मनोज गुप्ता, माजी नगरसेवक सुरेशतात्या म्हेत्रे, यश साने, विक्रम मीना, नीरज शाही गोदावरी हिंदी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका कुसुम तिवारी, सामाजिक कार्यकर्त्या बिंदू तिवारी यांच्यासह शेकडो भाविकांचा समावेश होता.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.