Chinchwad : एकदा संधी द्या, मावळचा कायापालट करून दाखवू – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभेच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची(Chinchwad) गरज आहे. तुम्ही मला एकदा संधी द्या, मावळचा लोकसभेचा कायापालट करून दाखवू, असे आवाहन  मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी काळेवाडी परिसरात प्रचार दौ-यात केले.

काळेवाडीतील तापकीरनगर, ज्योतीबानगर, विजयनगर, नढेनगर आणि (Chinchwad)कोकणेनगर परिसरातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.  नागरिकांच्या गाठीभेटी घेत निघालेल्या संजोग वाघेरे पाटील हे सर्वांचीच आस्थेने तसेच, विनम्रपणे विचारपूस करीत होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण करीत स्वागत केले. तर, ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद देत शुभेच्छाही दिल्या.

या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार,दस्तगीर मणियार, हरेश (आबा) नखाते, गोरख पाटील, एकनाथ मजाळ, नरसिंग माने, सावताराम महापुरे, सुभाष लोंढे, कृष्णा येळवे, सागर शिंदे, अमोल राठोड, अमोल पालांडे, गणेश झिले, प्रशांत तरवटे, दत्ता गिरी, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, विशाल चव्हाण, तसलीम शेख, सुशीला पवार, सुनिता चव्हाण, श्रद्धा शिंदे, सृष्टी शिर्के, शितल मोरे, शितल पाटील, वैशाली बोरकर, कॉंग्रेसच्या सायली नढे, किरण नढे,  ज्ञानेश्वर मलशेट्टी, रवी नांगरे, चंद्रशेखर जाधव, संतोष पवार, संजय मोरे, दिपक अंकुश, प्रकाश अंकुश, राष्ट्रवादीचे इम्रान शेख, सागर तापकीर, शिरीष जाधव, रवी नागरे, सचिन निंबाळकर, समाजवादी पक्षाचे बी.डी यादव, रवी यादव, गणोर सहानी, महादेव वझे, सलार शेख, ब्रिजेश यादव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, अखिल भारतीय छावा संघटनेचे धनाजी येळकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोले, सचिन लिमकर, धनाजी येळेकर, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक-युवती यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Pimpri : शहरातील राम मंदिरांना भेट देत श्रीरंग बारणे यांनी साधला रामभक्तांशी संवाद

या वेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबसाहेब तापकीर यांचे आशीर्वाद घेत तापकीर यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या. हरेश तापकीर, विनोद तापकीर, मच्छिंद्र तापकीर, मल्हारी तापकीर, चंद्रकांत तापकीर, शशिकांत तापकीर, मारुती दाखले बाळासाहेब नढे, शंकर नढे,  नीता पाडाळे, सुरेश नढे पाटील, संतोष कुरावत, नवनाथ नढे पाटील, ज्योती भारती, दत्ता पवार, तुकाराम हापसे, सुभाष मुळे, दिलीप आप्पा काळे, सचिन काळे, नेताजी नखाते, शामराव काळे, दिनेश नढे, ज्ञानेश्वर काळे, विजय काळे, मल्लेश कदरापूरकर, संजय पगारे, चंद्रशेखर जाधव, शिवाजी काळे,  किरण नढे, विलास नढे, योगेश शिरसाठ, दिलीप आंब्रे, अर्जुन शिरसाठ, संजय मोरे यांच्याही वाघेरे पाटील यांनी भेटी-गाठी घेतल्या.

परिसरातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी वाघेरे पाटलांना मोठा प्रतिसाद देत आम्ही खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. तसेच वाघेरे पाटलांनी सर्वाकडून शुभेच्छांचा स्वीकार करत, सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.