Loksabha election : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला अमेठीमधून निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी लढेन – राहुल गांधी

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला अमेठीमधून  लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी  नक्कीच लढेन असे वक्तव्य राहुल गांधी यांनी आज (दि.17 एप्रिल) केले. ते आज अखिलेश यादव यांच्याबरोबर गाझीयाबाद येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी गाझियाबाद येथे संयुक्त परिषद घेतली. या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना पत्रकारांनी अमेठीतून निवडणूक(Loksabha election) लढवणार का असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेसमध्ये कोणत्याही निवडणुकीत उमेदवार ठरविण्याचा अधिकार  कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीला आहे. या समितीने जर ठराव केला आणि तो कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मान्य केला तर मी नक्कीच अमेठीमधून निवडणूक लढेन.

 

Pune: जो कोणी उमेदवार पक्ष देईल, त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडुन आणून महाविकास आघाडीचे हात बळकट करायचे, काँग्रेसच्या बैठकीत निर्धार

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की,केंद्र सरकारने राबवलेली निवडणूक रोखे योजना खंडणी वसूल करण्याचे रॅकेट होते आणि त्याचे संचालक पंतप्रधान मोदी होते, असा सणसणीत आरोप त्यांनी केला.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, भाजपला 150 पेक्षा जास्त जागा या लोकसभा निवडणुकीत मिळणार नाहीत. भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे गोदाम आहे. उत्तरप्रदेशात डबल इंजिन आहे असा देशात गाजावाजा केला जातो पण प्रत्यक्षात एकाच व्यक्तीचे छायाचित्र दिसत आहे. डबल इंजिनवाल्या दुसऱ्या नेत्याचे (योगी आदित्यनाथ) यांचे छायाचित्र का दिसत नाही? त्यांचे चित्र गेल्या काही दिवसांपासून फलकांमधून गायब झालेले दिसून येत आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींचे छायाचित्रसुद्धा प्रत्येक फलकांवरून गायब होईल. या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना जनता भरघोस मतदानाने विजयी करेल आणि भाजपला 150 पेक्षा जास्त जागा या लोकसभा निवडणुकीत नक्कीच मिळणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.