Nigdi News : मॉडर्नतर्फे निगडीत मंगळवारपासून वसंत व्याख्यानमाला; विविध सांकृतिक कार्यक्रम  

एमपीसी न्यूज – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडी यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलातर्फे 26 ते 28 एप्रिल  दरम्यान वसंत व्याख्यानमालेचा सांस्कृतिक उपक्रम आयोजित केला आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. व्याख्यानमालेचे यंदाचे 28 वे वर्ष आहे.

निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलात मंगळवार ते गुरुवार सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत रोज सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. तर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, ज्योत्स्ना एकबोटे स्वागतोत्सुक असणार आहेत.

मंगळवारी (दि. 26) मंदार परळीकर प्रस्तुत महाराष्ट्र लोककला परिचय हा कार्यक्रम होईल. बुधवारी (दि. 27) राहुल सोलापूरकर प्रस्तुत छत्रपती शाहू महाराज चरित्र हा कार्यक्रम होणार आहे. तर, गुरुवारी (दि. 28) स्वाती महाजन प्रस्तुत ”वो जब याद आये…” हा कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.