Nigdi News : निगडी येथे रविवारी एक दिवसीय बुद्धीबळ स्पर्धा

एमपीसी न्यूज कै.  शिवाजीराव कोंडे यांच्या स्मृती दिनी (Nigdi News) निगडीतील यमुनानगर येथील शषिवभूमी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रविवारी (दि.1 जानेवारी) रोजी एक दिवसीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हि स्पर्धा वय वर्ष 8, 10, 12 व 15 या वयोगटात पार पडणार आहे. यावेळी विजेत्य़ांना 51 हजार रोख बक्षिस दिले जाणार आहे. या बरोबरच इतर विजेत्यासाठींही 18 चषक, 50 हून अधिक मेडल्स दिले जाणार आहेत.ही स्पर्धा जागकित बुद्धीबळ स्पर्धेच्या नियमानुसार खेळवली जाणार आहे.

Sports Competition : महाराष्ट्रात होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

ही सपर्धा सकाळी साडे नऊ पासून सुरु होणार असून (Nigdi News) रविवारी सायंकाळी साडे सात वाजता बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे, अशी माहिती शिवभूमी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र कोंडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.