Pimpri News : शहरात अवघ्या तीन तासात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या 66 तर रॅश ड्रायव्हिंग च्या 62 केसेस

एमपीसी न्यूज नवीन वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केवळ नागरिकच नाही तर पोलीस प्रशासन देखील तयारीला लागले आहेत. या दिवसात कोणती ही दुर्घटना घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात नाकाबंदी  केली आहे. (Pimpri News) ज्यामध्ये 29 डिसेंबर रोजी रात्री नऊ ते बारा या तीन तासाच्या कालावधीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकऱणी 66 तर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी 62 जणांवर कारवाई कऱण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त  विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे येथे 29 तारखेपासून नाकाबंदी असून ती 1 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी असणार आहे.

Nigdi News : निगडी येथे रविवारी एक दिवसीय बुद्धीबळ स्पर्धा

तरी नागरीकांनी मद्य प्राशन करुन तसेच वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धोकादायकरित्या (रॅश ड्रायव्हिंग) वाहन चालवुन स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका निर्माण करु नये अन्यथा (Pimpri News) त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. वाहतुक नियमांचे पालन करुन पिंपरी-चिंचवड पोलीसांना सहकार्य करावे असे अवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.