Vadgaon Maval : तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 2.70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यातील चिखलसे, अहिरवडे, कुसगाव खु. गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दि.27) महिलांच्या हस्ते संपन्न झाला. (Vadgaon Maval) आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने जलजीवन मिशन अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण 2 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या निधीतून अहिरवडे व कुसगाव येथे पाण्याची टाकी होणार होणार असून पाणी वितरणासाठी सुमारे 15 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात येणार आहे. पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या भुमिपूजन समारंभास माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष सारिका शेळके,ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पा घोजगे,ओबीसी सेल अध्यक्ष संध्या थोरात, सरपंच सुलभा भोते, सविता बधाले, सरपंच सुनीता सुतार, कुसगाव उपसरपंच दिपाली लालगुडे, सदस्य कल्याणी काजळे,सविता सांगळे,मनिषा लालगुडे,पूनम आल्हाट,श्रुती मोहिते,वर्षा नवघणे, मनीषा लालगुडे, शशिकला सातकर, मनीषा भसे, सुवर्णा घोलप,अनिता मोहोळ, मीनाक्षी वाळुंज,शिल्पा चौधरी,अर्चना काजळे, सरपंच पप्पु येवले, सदस्य सुनिल काजळे, बाळासाहेब काजळे, बळवंत काजळे, संदीप काजळे,विजय काजळे,बंटी लालगुडे, तानाजी दाभाडे,गजानन शिंदे,निलेश दाभाडे आदि मान्यवर, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Pimpri News : शहरात अवघ्या तीन तासात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या 66 तर रॅश ड्रायव्हिंग च्या 62 केसेस

यावेळी गावातील नागरिकांनी  रस्त्यांवर रांगोळ्या काढून तसेच ढोल लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांचे भव्य स्वागत केले. नव्याने होणार असलेल्या या नळ पाणी पुरवठा (Vadgaon Maval) योजनेमुळे चिखलसे, अहिरवडे व कुसगाव खुर्द या तिन्ही गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील नागरिकांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार सुनिल शेळके यांचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.