Nigdi : पादचाऱ्याला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज- चार जणांच्या टोळक्याने पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली. बुधवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास काळभोरनगर परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी राजू गणपत उबाळे (वय-40 रा. ओटास्कीम निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुब्रे शेख, फिरोज डंके, सचिन थोरात, बाळा कोंढाळकर (सर्व राहणार यमुनानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

उबाळे हे बुधवारी रात्री उबाळे हे काळभोरनगर परिसरातून पायी जात होते. जुना पुणे-मुंबई महामार्ग येथे काळभोर यांच्या हॉटेलजवळ आले असता चौघा आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना दगड व लोखंडी गजाने मारहाण करत 10 हजार रूपये किमतीचा मोबाईल व 2 हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.