Nigdi diwali padva : हजारो दिव्यांनी उजळले निगडी प्राधिकरण

एमपीसी न्यूज – दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने निगडी प्राधिकरणात वेगवेगळ्या चार ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला.(Nigdi diwali padva) यावेळी नागरिकंनी प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शर्मिला  बाबर आणि राजेंद्र बाबर मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला.(Nigdi diwali padva)दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळवार  (दि. 25 ) रोजी निगडी प्राधिकरणातील संत तुकाराम महाराज उद्यान, श्री सोमेश्वर मंदिर उद्यान, माऊली उद्यान आणि रामबाग या चार ठिकाणी हा दीपोत्सव साजरा झाला.

Online job fraud : दुबईच्या कंपनीतील नोकरीच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कर्यकर्ते राजेंद्र बाबर यांच्यासह माजी महापौर आर. एस. कुमार, भाजप पदाधिकारी सलीम शिकलगार, सचिन कुलकर्णी, राधिका बोरळीकर, अतुल इनामदार, विनोद कदम, मंगेश पिसाळ, सुभाष टाक, मीनानाथ इनामदार आदी, तसेच निगडी प्राधिकरण परिसरातील असंख्य नागरिकांनी या दीपोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला. (Nigdi diwali padva) नागरिकांनी हजारो दिवे प्रज्वलित केले. या दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला. निगडी प्राधिकरणातील भारतीय जनता पार्टी, राजेंद्र बाबर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.