Aaditya Thackeray : अधिकच्या पावसामुळे नव्याने उपाययोजना करण्याची गरज : आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊन वाहतूक कोंडी आणि अन्य नुकसान झाले. विकास प्रक्रियेमुळे पावसाळी प्रवाह बदलत आहे.(Aaditya Thackeray ) त्यामुळे पर्यावरणातील बदलांमुळे होणाऱ्या अधिकच्या पावसामुळे नव्याने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज ठाकरे यांनी भेट घेतली.

पुण्यामध्ये पावसाळ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शहराचा कंटूर सर्व्हे करून त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशी सूचना वजा मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी त्यांनी पुणे शहरातील झालेल्या अभूतपूर्व पावसासंदर्भात चर्चा केली. (Aaditya Thackeray) शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहीर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

Nigdi diwali padva : हजारो दिव्यांनी उजळले निगडी प्राधिकरण

आयुक्तां सोबत पुणे शहरातील समस्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नदी सुधार योजनेमध्ये नागरिकांच्या शंकाचे निरसन करून उपाययोजना कराव्यात.(Aaditya Thackeray) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गर्दी व रस्त्यांच्या रुंदीनुसार मोठ्या आणि छोट्या आकाराच्या ई – बसेसचे नियोजन करण्यात यावे. अशी मागणीही ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.