Sachin Kalbhor : विनापरवाना उभारलेल्या मंडपावर कारवाई करा अन्यथा मुंडन आंदोलन  – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील आरक्षित महापौर मैदानावर विनापरवाना उभारलेल्या मंडपावर कारवाई करावी. अन्यथा 16 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण,(Sachin Kalbhor) मुंडन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, महापौर मैदानावर एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी 15 हजार स्केअर फुट विनापरवाना मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. याविरोधात प्रशानाने तातडीने कारवाई करावी. मैदानाचे भाडे वसूल करावे. केवळ 1 हजार स्केअर फुटाच्या भाड्याची रक्कम अ क्षेत्रीय कार्यालयात कार्यक्रम आयोजकांनी जमा केली आहे.

AAP : डॉ.अनिल रॉय यांच्या नेतृत्वात काळभोर नगर येथील कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

प्रत्यक्षात 15 हजार स्केअर फुट विनापरवाना मंडप उभारण्यात आला आहे.  त्याला अ क्षेत्रीय कार्यालयाने कोणतीही परवानगी दिली नाही. हा कार्यक्रम दोन महिने होणार आहे. महापौर मैदानाच्या शेजारी महाविद्यालय, शाळा असून पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही.(Sachin Kalbhor) या कार्यक्रमामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. याची अ क्षेत्रीय कार्यालयाने ताबडतोब दखल घेऊन कारवाई करावी. अन्यथा 16 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण, मुंडन आंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.